सातारा येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा !
सातारा, ३ मे (वार्ता.) – साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, सातारा आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. ७ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणावर विवाहसोहळा होईल. वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी विवाहसोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.