राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासंबंधी ५ मे या दिवशी समितीचा जो निर्णय होईल तो मान्य ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र देतांना मी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्वासात घ्यायला हवे होते. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्यांनी ५ मे या दिवशी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल, तो मला मान्य असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ३ मे या दिवशी येथे केले आहे. २ मे या दिवशी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर त्यांनी प्रथमच अशी प्रतिक्रिया दिली आहे.