आळंदीतील रिक्‍शाचालकाची अभिनव आणि स्‍तुत्‍य योजना !

‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट पहाणार्‍यांना विनामूल्‍य रिक्‍शा सेवा !

साधू मगर व त्‍यांनी रिक्‍शावर लावलेला मोठा ‘बॅनर’

आळंदी (जिल्‍हा पुणे) – ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट पहाण्‍यासाठी जाणार्‍या लोकांना आळंदीतील एक रिक्‍शाचालक विनामूल्‍य रिक्‍शा सेवा देणार आहे. अधिकाधिक हिंदु महिलांनी हा चित्रपट पहावा आणि इस्‍लामी कटांविषयी जागरूक अन् सतर्क रहावे, अशी त्‍यांची इच्‍छा आहे. साधू मगर असे त्‍यांचे नाव असून सध्‍या त्‍यांचे छायाचित्र सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित होत आहे. या छायाचित्रात त्‍यांनी रिक्‍शावर मोठा ‘बॅनर’ लावल्‍याचे दिसत आहे. या ‘बॅनर’वर ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट पहाण्‍यासाठी जाणार्‍या लोकांना स्‍वत:ची रिक्‍शा विनामूल्‍य आहे, तसेच चित्रपट पहाण्‍यासाठी जाणार्‍या पहिल्‍या १० महिलांसाठी विनामूल्‍य तिकीटही देणार आहे’, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट ५ मे या दिवशी प्रदर्शित होत आहे.
प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची जोरात चर्चा चालू आहे. ‘लव्‍ह जिहाद’च्‍या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्‍थिती यांसारख्‍या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्‍यात आली आहे. एका अत्‍यंत वेगळ्‍या विषयावरील मांडणी करत विपुल शहा यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे; परंतु ‘द कश्‍मीर फाइल्‍स’प्रमाणे या चित्रपटालाही विरोध होत आहे. अनेक मुसलमान संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

संपादकीय भूमिका 

‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट सत्‍य घटनांवर आधारित आहे. यामध्‍ये केरळमधील ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये अडकलेल्‍या हिंदु आणि ख्रिस्‍ती तरुणींचे सत्‍य उघड करण्‍यात आले आहे. हे सत्‍य हिंदु महिलांपर्यंत पोचवण्‍याची एका सामान्‍य रिक्‍शाचालकाची धडपड हिंदूंसाठी प्रेरणादायीच !