खवल्यांची तस्करी करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोघांना कुपवाड येथे अटक
सांगली – कुपवाड शहरात खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी करत असल्या प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी खवले विक्री करण्यास आलेल्या रत्नागिरीच्या दोघांना अटक केली आहे.
कुपवाड ते माधवनगर रस्त्यावर अहिल्यानगर येथे पोलिसांनी संशयित इम्रान अहमद मुलाणी, अलोरे आणि दिनेश गोपाळ डिंगणकर चिंद्रवळे, ता. गुहागर या दोघांना कह्यात घेऊन त्यांच्याकडून ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अनुमाने ११ लक्ष ८७ सहस्र ७०० रुपये किमतीची खवले हस्तगत केले.