दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बेअंत सिंग हत्या प्रकरण
नवी देहली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची वर्ष १९९५ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील दोषी बलवंत सिंग राजोआना याला ठोठावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्याची मागणी त्याने याचिकेत केली होती.
The Supreme Court on Wednesday, May 3, 2023. did not intervene in a plea by #BalwantSinghRajoana to commute his death penalty to life sentence for the assassination of former Punjab chief minister Beant Singh in 1995.https://t.co/EnmrqKCLaG
— The Hindu (@the_hindu) May 3, 2023
२६ वर्षांच्या दीर्घ कारावासाच्या आधारे राजोआना याने फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी २ मे या दिवशी केंद्र सरकारला राजोआना याने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर दोन मासांत निर्णय घेण्यास सांगितले होते; मात्र केंद्राकडून कोणताही निर्णय न आल्याने गेल्या वर्षी २८ सप्टेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वत:कडे घेतले होते. जुलै २००७ मध्ये विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. ( शिक्षा ठोठावल्यानंतर एवढी वर्षे उलटूनही त्याची कार्यवाही न करणे पंजाबमधील आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! – संपादक)