श्री महाकालीमातेचा अवमान केल्याच्या प्रकरणी रशियाचीही युक्रेनवर टीका
नवी देहली – युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने श्री महाकालीदेवीचा अवमान करणारे एक चित्र प्रसारित केल्यानंतर त्याला भारताने विरोध केला होता. त्यानंतर युक्रेनने क्षमायाचना केली होती. आता रशियानेही या चित्रावरून युक्रेनला विरोध केला आहे.
सौजन्य हिंदुस्थान टाईम्स
संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे प्रतिनिधी दिमित्री पोलिंस्की यांनी सांगितले की, युक्रेन सरकार कुणाच्याही धार्मिक भावनांचा आदर करत नाही; मग ते हिंदु असो, मुसलमान असो कि ख्रिस्ती असोत. युक्रेनचे सैनिक कुराण जाळत आहेत. श्री महाकालीमातेचा अवमान करत आहेत. ख्रिस्त्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करत आहेत. युक्रेनची केवळ नाझी विचारसरणीवर श्रद्धा आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी हिंदूंची बाजू घेणार्या रशियाचे आभार ! |