शरद पवार यांच्या त्यागपत्रावर आता बोलणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे विधान
नागपूर – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर त्याला पक्षातून तीव्र विरोध होत आहे; मात्र शरद पवार यांच्या त्यागपत्रावर आताच बोलणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांचे त्यागपत्र हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर आताच बोलणे योग्य नाही. या प्रकरणी २ दिवसांनी बोलू. त्यासाठी आम्हाला वाट पहावी लागेल. काय होत आहे ? का होत आहे ? हे सगळे ठरू द्या. नंतर त्यावर बोलेन. मी शरद पवार यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आता बोलणार नाही; मात्र मलाही पुस्तक लिहायचे आहे. योग्य वेळी ते लिहीन.