गेली १६ वर्षे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी कार्यरत घालवाड (जिल्हा सांगली) येथील ‘श्री बजरंगबली करिअर ॲकॅडमी’ !
सांगली, २ मे (वार्ता.) – घालवाड येथील ‘श्री बजरंगबली करिअर ॲकॅडमी’ वर्ष २००७ पासून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी कार्यरत आहे. ‘ॲकॅडमी’चे अध्यक्ष श्री. तानाजी थोरवत, श्री. संतोष फडतारे, श्री. योगेश परीट आणि त्यांचे सहकारी हे विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस, वनविभाग येथे प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने त्यांना गेली १६ वर्षे विनामूल्य शारीरिक प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ होऊन अनेक विद्यार्थी आतापर्यंत शासकीय सेवेत भरती झाले आहेत. यासाठी लागणारे साहित्य ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभे करून आदर्श निर्माण केला आहे. हे कार्य जाणून घेतल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे यांनी ‘ॲकॅडमी’चे अध्यक्ष श्री. तानाजी थोरवत यांची भेट घेऊन त्यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी समितीचे श्री. जयवंत रसाळ उपस्थित होते.