बिलावल भुट्टो यांची बहीण फातिमा भुट्टो हिने निकाह केल्यानंतर महादेव मंदिरात जाऊन घेतले दर्शन !
कराची – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांची बहीण फातिमा भुट्टो हिने निकाह केल्यानंतर पति ग्राहम जिब्रान याच्यासमवेत येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे सामाजिक माध्यमांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ४० वर्षीय फातिमा ही पाकिस्तानचे दिवंगत पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची नात तथा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांची भाची आहे. फातिमाचा पती ग्राहम हा ख्रिस्ती असून अमेरिकी नागरिक आहे. या वेळी मंदिरात जाऊन त्यांनी दग्धाभिषेक केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत भाऊ जुल्फिकार अली भुट्टो (जुनिअर) आणि काही हिंदु नेते उपस्थित होते.
Pakistan: बिलावल भुट्टो की बहन ने निकाह के बाद कराची के हिंदू मंदिर में जाकर किए दर्शन, सोशल मीडिया पर हलचल#Pakistan #BilawalBhutto #FatimaBhutto #HinduTemplehttps://t.co/ue5GugUmTU
— Amar Ujala (@AmarUjalaNews) May 2, 2023
संपादकीय भूमिकामंदिरात जाऊन दर्शन घेणारे पाकमधील मुसलमान नेते मंदिरांवरील आक्रमण रोखण्यासाठी काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या ! |