तिहार कारागृहात २ गटांच्या मारहाणीत कुख्यात गुंड ठार
नवी देहली – तिहार कारागृहातील २ गटांमध्ये झालेल्या हाणामारीत टिल्लू ताजपुरिया हा कुख्यात गुंड ठार झाला आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
Gangster Tillu Tajpuriya, accused in Delhi court shootout, killed by rival gang members in Tihar.
(@Sreya_Chattrjee)#TilluTajpuriya #ITVideo @PoojaShali pic.twitter.com/nbbo8DYYLT— IndiaToday (@IndiaToday) May 2, 2023
कारागृह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृह क्रमांक ८ मध्ये बंद असलेल्या योगेश टुंडा नावाच्या बंदीवानाने टिल्लू याच्यावर अचानक लोखंडी ग्रीलद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात टिल्लू गंभीर घायाळ झाला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात भरती केले. तेथे उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाकारागृहातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ? |