कोयता गँगच्या दहशतीनंतर मुंढव्यातील (पुणे) केशवनगरमधील दुकाने बंद !
पुणे – मुंढव्यातील केशवनगर भागातील एका नागरिकावर टोळक्याने कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर १ मे या दिवशी या भागातील नागरिकांनी बंद पाळला. या भागात दहशत माजवणार्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)