(म्हणे) ‘एकही ब्राह्मण भारतीय नाही, तर ते रशियाहून आले !’ – बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार
|
पाटलीपुत्र (बिहार) – एकही ब्राह्मण भारतीय नाही. आपण या देशाचे मूळ निवासी आहोत. ब्राह्मण हे मूळचे रशियन आहेत. यासंदर्भात केलेल्या ‘डी.एन्.ए.’ चाचणीतून हे सिद्ध झाले आहे, असे वक्तव्य बिहारमधील सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस यदुवंशकुमार यादव यांनी केले. (‘हा शोध कुणी लावला ?’, ‘त्यासाठी काय संशोधन करण्यात आले ?’, याची माहिती यादव यांनी द्यावी. सवंग लोकप्रियतेसाठी राजकारणी किती टोकाची विधाने करतात, हे यातून दिसून येते ! – संपादक)
#WATCH | “The DNA test shows no Brahmins belong to this country and are from Russia and now have settled here. Brahmins are trying to divide us and rule. We should chase them away from here,” said RJD leader Yaduvansh Kumar Yadav in Bihar’s Supaul yesterday pic.twitter.com/e2AOUPZTx1
— ANI (@ANI) May 2, 2023
१. यादव पुढे म्हणाले की, ब्राह्मण आपल्याला एकमेकांमध्ये भांडायला लावून आपल्यावर राज्य करत आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे यांना रशियातून पळवून लावले गेले, तसेच त्यांना आता आपण येथूनही पळवून लावायला हवे.
२. सत्तेतील मित्रपक्ष असणार्या संयुक्त जनता दलाकडून यादव यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अभिषेक कुमार झा यांनी यादव यांचे वक्तव्य वादग्रस्त असल्याचे सांगत म्हटले की, परशुराम रशियातून आले होते कि इतर कोणत्या देशातून ? केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अशी विधाने केली जात आहेत. राजदने अशा नेत्यांविरोधात कारवाई करायला हवी.
संपादकीय भूमिकाराजदच्या नेत्याने ब्राह्मणद्वेषातून केलेले विधान ! अशी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्या राजकारण्यांना हिंदूंनी ते मिळतील तेथे जाब विचारावा ! |