सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !
तस्मै श्री गुरवे नमः ।’
साधकांमध्ये दिव्य ज्ञानाचे कमळ विकसित करणारे तेजोनिधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणकमली नमन !
‘सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः।
वेदान्ताम्बुजसूर्यो यस्तस्मै श्रीगुरवे नमः ॥ – गुरुगीता, श्लोक ६८
अर्थ : ज्यांचे चरणकमल सर्व वेदांच्या मुकुटमणीरूप श्रुतींनी (महावाक्यांनी) सुशोभित आहे, जे वेदांतरूपी कमळाला विकसित करणारा जणू सूर्यच आहेत, अशा श्री गुरूंना नमस्कार असो.’
भावार्थ : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनोहारी चरण कमलांकडे पहातांना साधकांना अशीच अनुभूती येते. ‘त्या चरणांमध्ये संपूर्ण जग आणि जगातील संपूर्ण ज्ञानाचे महाभांडार सामावले आहे’, या भावाने साधक गुरुचरणी नतमस्तक होतात. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर सरोवरातील कमळे उमलतात, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या केवळ स्मरणरूपी अस्तित्वामुळे साधकांच्या जीवनात नवचैतन्य संचारते. साधकांचे अज्ञान दूर करून त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती करून देणार्या आणि तेजोनिधी सूर्यासमान असलेल्या चैतन्यसूर्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री चरणी कोटीशः नमन !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१.५.२०२३)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील अस्तित्वाची प्रचीती आल्याने त्यांच्या स्थूल रूपाची ओढ न्यून होणे
१. परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व पंचतत्त्वांच्या माध्यमातून अनुभवता येणे
अ. ‘फेब्रुवारी २०२१ पासून परात्पर गुरु डॉक्टरांंना प्रार्थना करतांना किंवा त्यांच्या संदर्भात भावप्रयोग करतांना माझ्या डोळ्यांसमोर त्यांचे रूप येत नाही. त्या ठिकाणी कधी तेजोमय पिवळा, तर कधी शांती प्रदान करणारा पांढरा प्रकाश दिसतो.
आ. काही वेळा त्यांचे स्मरण केल्यावर थंडगार वार्याचा स्पर्श होतो आणि मन शांत होते.
इ. ‘परात्पर गुरु डॉक्टर स्थुलातून माझ्या जवळ नाहीत’, असे मला जाणवते. त्या वेळी माझ्या मनाला दुःख होत नाही कि वाईटही वाटत नाही. ‘आता परात्पर गुरु डॉक्टर मला पंचतत्त्वांच्या माध्यमातून भेटत आहेत’, असे जाणवते.
२. परात्पर गुरु डॉक्टरांंचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवून मन शांत होणे
अ. पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण झाल्यावर ‘ते कुठे दिसतील का ? त्यांचा आवाज ऐकू येईल का ?’, असे मन शोधत रहायचे; परंतु भगवंतानेच या अनुभूतीतून माझी स्थुलातील आस न्यून करून मन शांत केले. ‘आता परात्पर गुरु डॉक्टर सतत माझ्यासमवेत माझ्या मनात आणि हृदयात आहेत’, असे मला जाणवते.
आ. प्रार्थना आणि भावप्रयोग करतांना माझ्या हृदयस्थानी, तसेच अनाहत आणि आज्ञा चक्रस्थानी माझे मन लवकर एकाग्र होते.
‘हे गुरुदेव, तुम्हाला जे शिकवायचे आहे, ते मला शिकता येऊ दे. मला आपल्या चरणी अखंड लीन आणि शरणागतभावात ठेवा.’
– होमिओेपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |