कर्जत तालुक्यातील विकासकामांसाठी ८० कोटी रुपयांचा निधी संमत
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कामांचे भूमीपूजन पार पडले
अलिबाग – रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ, शेलू, दामत, उमरोली, किरवली, चिंचवली, माणगाव, तर्फे, वरेडी, हालवली आणि उक्रुळ या नऊ ग्रामपंचायतींसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून विकासकामे संमत करण्यात आली आहेत. या सर्व विकासकामांसाठी ८० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या कामांचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते २९ एप्रिल या दिवशी भूमीपूजन पार पडले. २०२३-२४ या वर्षीच्या अर्थसंकल्पात वरील ९ ग्रामपंचायतींधील कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील विकास कामांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
80 कोटी रुपयांचा निधी मंजूर pic.twitter.com/NkHUIf7YcD— जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) April 29, 2023