मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !
अतीवेगातील ७ सहस्र वाहनांकडून दंड वसूल
मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती आणि राष्ट्रीय महामार्गावर एकूण ४० सहस्र ९०९ वाहनांवर परिवहन विभागाने कारवाई केली. ७ सहस्र वाहनांवर अतीवेगाने वाहन चालवल्याविषयी दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे कारवाई वाढत असतांना अपघातांत नाममात्र घट झाली.
मुंबई-पुणे दरम्यान दोन्ही महामार्गांवर १ डिसेंबरपासून सुरक्षा मोहीम चालू आहे. १ डिसेंबर २०२२ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई करत ७ कोटी २२ लाख ७९ सहस्रांचा दंड वसूल केला आहे. महामार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ मासांत एकूण ६ सहस्र ९८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकाआतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |