छत्रपती संभाजीनगर येथे लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणार्या ‘सिरप’चा नशेसाठी वापर; २ मुसलमानांना अटक !
छत्रपती संभाजीनगर – येथे लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणार्या सिरपचा नशेसाठी वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सय्यद मेहमूद आणि शहजाद शेख यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापर होणार्या गुंगीकारक ‘मोनोकॉफ प्लस कफ सिरप’च्या बाटल्या मिळाल्या. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या एन्.डी.पी.एस्. पथकाने आरोपींकडून नशेच्या बाजारात जाणार्या ९३ ‘सिरप’च्या बाटल्यांसह २ लाख ९४ सहस्र ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांकडे या औषधाविषयीची कुठलीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाप्रत्येक गुन्ह्यामध्ये मुसलमानांचा सहभाग असणे, हे गंभीर आहे. यासाठी धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |
औषध दुकानदाराची भूमिकाही संशयाच्या भोवर्यात !
विशेष म्हणजे हे औषध आधुनिक वैद्यांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’विना विकता येत नाही. ज्या औषध दुकानातून हे औषध विकले गेले त्याला रुग्णाची नोंद करून घ्यावी लागते, तसेच ४२ रुपये मूल्य असणारे हे ‘सिरप’ काळ्या बाजारात २०० रुपयांत मिळते. या औषधाचा नशेसाठी वापर होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे ‘प्रिस्क्रिप्शन’विना हे औषध विकणार्या औषध दुकानदाराची भूमिकाही संशयाच्या भोवर्यात आहे.