अवेळी पावसाने उन्हाळ्यातच बीड बसस्थानक बनले तळे !
सुविधायुक्त बसस्थानकाविषयीचे बीडवासियांचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? – स्थानिकांचा संतप्त प्रश्न
बीड – मागील ३ दिवसांत पडलेल्या वादळी वार्यासह अवेळी पावसाने येथील बसस्थानकाची अवस्था एखाद्या तळ्याप्रमाणे झाली आहे. बसस्थानकातील खड्डे बुजवण्यात न आल्याने, तसेच बसस्थानकाची दुरुस्ती न केल्याने पडलेल्या पावसाने बसस्थानकात पाणी साठून राहिले. या पाण्यातूनच प्रवाशांना मार्ग काढत बसमध्ये प्रवेश करावा लागत होता. त्यामुळे उन्हाळा असूनही अवेळी आलेल्या पावसाने ही अवस्था होत असेल, तर पावसाळ्यातील ४ मासांमध्येकोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल ?, तसेच सुविधायुक्त बसस्थानकाविषयी बीडवासियांचे स्वप्न कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. (बसस्थानकाच्या दुरवस्थेला उत्तरदायी असणार्या परिवहन महामंडळाचे अपयश ! बसस्थानकातील रस्ताही दुरुस्त करू न शकणारे महामंडळ प्रवाशांच्या अन्य सुविधांचा काय विचार करत असेल ? एस्.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा करणे आवश्यक ! – संपादक)
बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बीड शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप . #बीड #अवकाळी #पाऊस #Ilovedharur pic.twitter.com/EjwdDMGr1u
— आपलं बीड (@ilovedharur) April 28, 2023