राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, फेरी, निवेदन !

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांचा अवमान केला जाणे, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण होय !

इचलकरंजी येथे समस्त हिंदु समाजाच्या वतीने पत्रकारांना माहिती देतांना महाजनगुरुजी

कोल्हापूर – हेर्ले या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची अज्ञातांनी विटंबना केली. या विटंबनेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले आणि अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला, तसेच फेरी काढून दोषींवर कठोर कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. याच प्रकरणी ३० एप्रिलला पेठवडगाव बंद होते, तर उंचगाव येथे सायंकाळी निदर्शने करण्यात आली. १ मे या दिवशी वाठार, किणी बंद असून ३ मे या दिवशी हुपरी गाव बंद असेल.

१. या प्रकरणी रुकडी, कोडोली, येळगुड, माणगाव, अतिग्रे, चोकाक, माले, मुडशिंगी, सावर्डे, मिनचे, घुणकी या गावांमध्ये बंद पाळण्यात आला. रुकडी येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने गावातून निषेध फेरी काढण्यात आली. येथील शिवाजी चौकात झालेल्या निषेध सभेत माजी उपसरपंच अमित भोसले यांनी ‘अशा अपप्रवृत्तींच्या विरोधात कठोर शासन झाले पाहिजे’, अशी मागणी केली.

२. रुकडी येथे सरपंच राजश्री रूकडीकर यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला.

३. यळगुड येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

४. हुपरी येथे या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले. या प्रसंगी हिंदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५. इचलकरंजी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून धर्मांधाकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील, अशी कृत्ये वारंवार केली जात आहेत, तसेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोहत्या या माध्यमांतून देशभरात धर्मांध हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी या प्रकरणी दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद होऊन त्याच्याशी संबंधित प्रार्थनास्थळांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी इचलकरंजी येथे समस्त हिंदु समाजाच्या वतीने २ मे या दिवशी सकाळी १०.३० वाजता कॉम्रेड मलाबादे चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय अशी फेरी काढून पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती समस्त हिंदु समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पेठवडगाव येथे पाळण्यात आलेला बंद

 

हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ