प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांचा पुण्यातील कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला !
पुणे – प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांचा राजाबहाद्दूर मिल परिसरामध्ये चालू असलेला गाण्यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी बंद केला. रात्री १० नंतरही हा कार्यक्रम चालू असल्याने तो बंद करत रेहमान यांनाही खडेबोल सुनावले. रेहमान यांनी पोलिसांची कोणताही वाद न करता कार्यक्रम बंद केला. या प्रकारामुळे जमलेल्या श्रोत्यांनी नाराजी व्यक्त केली. रात्री १० वाजल्यानंतर कोणताही कार्यक्रम चालू ठेवण्यास न्यायालयीन अनुमती घेणे आवश्यक असते.
पुण्यातील ए आर रेहमान यांचा शो पोलिसांनी थांबवलाhttps://t.co/NGrrTTVrZG
#pune#arrehman#musiclovers#concert#musicshow#arrehmanfan#arrehmanmusic
— Time Maharashtra (@TimeMaharashtra) May 1, 2023
(कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांनी कार्यक्रम रात्री १० च्या पुढे जात आहे, तर बंद करण्यास पुढाकार का घेतला नाही ? आणि वर पोलीस कारवाई झाल्यावर नाराजी व्यक्त करणे हा बेदरकारपणा झाला. – संपादक) राजाबहाद्दूर मिल परिसरामध्ये रात्री १० नंतरही गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. याविषयी माहिती मिळताच पुणे पोलिसांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत कार्यक्रम बंद पाडला.