सरकारी सेवेत रुजू झाल्यावर प्रलोभनांना बळी पडू नका ! – अजित पवार
बारामती – स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून वरिष्ठ पदांवर जाण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे. सरकारी सेवेमध्ये लागल्यानंतर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य काम करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती मध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना दिला.
विद्या प्रतिष्ठान, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाच्या अंतर्गत पोलीसदलात, तसेच इतर शासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. डॉ. सुनील ओगले यांनी ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाविषयी माहिती दिली, तर डॉ. भरत शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.