श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे लांजा येथे तरुणांना आवाहन
जमेल तेवढा वेळ आपल्याला धर्मकार्यासाठी द्यायचा आहे !
लांजा, १ मे (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जो हिंदवी स्वराज्याचा मंत्र दिला आहे, तो मंत्र आम्ही प्रत्येकाला जाऊन सांगितला पाहिजे. यासाठी लांजा तालुक्यातून किमान १० सहस्र तरुण राष्ट्रकार्यासाठी प्रेरित झाले पाहिजेत. येत्या २ वर्षांत आपण रायगडावर ३६ मण सोन्याच्या सिंहासनाची स्थापना करणार आहोत. या कामी म्हणजेच खडा पहारा देण्यासाठी तरुणांची फौज निर्माण होणे आवश्यक आहे आणि हीच खडा पहारा देणार्या तरुणांची फौज गावागावांत खडा पहारा देईल. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या अशा अनेक समस्यांना ही खडा पहाराची फौज गावागावांतील समस्यांना सक्षमपणे उत्तर देईल. त्यामुळे आता थांबायचे नाही, आपले कामधंदे सांभाळून, जेवढा वेळ जमेल, तेवढा वेळ धर्मकार्यासाठी आपल्याला द्यायचा आहे, असे जाज्वल्य विचार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी तरुणांसमोर मांडले.
१ मे या दिवशी येथील श्रीराम मंदिरात राष्ट्रप्रेमी हिंदु तरुणांना पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते. या मार्गदर्शनाला शंभर तरुण उपस्थित होते. पू. भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते आणि हिंदु धर्माभिमानीही उपस्थित होते.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक हिंदु तरुणांनी पुढील २ वर्षे राष्ट्रासाठी झटून कष्ट केले पाहिजेत. गावागावांत, घराघरांत जाऊन आपला हिंदु धर्म कसा श्रेष्ठ आहे ? भारतभूमी कशी श्रेष्ठ ? आहे, याविषयी सांगितले पाहिजे.’’