सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाई नाही; मात्र टंचाई आराखडा सिद्ध ! – निवासी उपजिल्हाधिकारी
कोल्हापूर, ३० एप्रिल (वार्ता.) – गत पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे बर्यापैकी भरलेली आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मेमध्ये सध्यातरी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही; मात्र त्या स्थितीतही कुठे टंचाई जाणवल्यास आम्ही आराखडा सिद्ध केला आहे. कुणाला टंचाई जाणवल्यास त्यांनी १०७७ या विनामूल्य क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.