युद्धातील मृतांच्या गणनेचे अनुमान !
अमित अग्रवाल यांनी लिहिलेल्या ‘स्विफ्ट हॉर्सेस शार्प स्वोर्ड्स’ पुस्तकातील अंश
१. युद्धात मृतांची आकडेवारी मोजण्याचे महत्त्व
‘लढाईतील मृतांची आकडेवारी कितपत अचूक असते ? आणि मृतक मोजण्याचे परिमाण काय असेल ?’, असे प्रश्न विशेषत: जेव्हा युद्धाच्या मैदानात सहस्रो लोक मारले जात होते, तेव्हा पडतात. मृतांची संख्या जाणून घेणे का आवश्यक आहे ? याचे कारण असे आहे की, प्रत्येक जीवन मौल्यवान असल्याने मृतकांची गणना करणे नैतिकदृष्ट्या अत्यावश्यक आहे. लढायांसाठी लागणारी मनुष्यांची आवश्यकता समजून घेण्यासाठी मृतकांचे मोजमाप एक चांगला पर्याय आहे. तथापि एक परिपूर्ण आकडा आदर्श असेल, तरीही एक योग्य अनुमानही चांगला पर्याय आहे. सध्याच्या काळात बलवान देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांना हस्तक्षेप करण्यासाठी हे प्रेरणा देते.
मध्ययुगीन लेखकांनी ५ किंवा ५० सहस्र यांसारखी आकडेवारी दिली. त्यांच्याकडून ४८ सहस्र ३२१ सारखी संख्या कधीच ऐकायला मिळाली नाही. केवळ आकडे पाहून कुणीही सहजपणे अनुमान लावू शकतो की, ते अतिशयोक्तीपूर्ण असून वातावरणात प्रभाव निर्माण करण्यासाठी सम संख्या लिहिली गेली आहे. सहसा शत्रूला आणखी भीती दाखवण्यासाठी आणि छळण्यासाठी वक्तव्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आकडे असतात.
२. पराजित पीडितांच्या शिरांचे (डोक्यांचा) पर्वत उभारून अघोरी आनंद मिळवण्याचा मोगल आक्रमणकर्त्यांचा खेळ
आक्रमणकर्त्यांना माणसे मारण्यात आनंद मिळायचा आणि त्यांची गणना करण्यात, तर त्यांना आणखीनच आनंद मिळत होता. ऐतिहासिक समाजात विजेते हे पीडितांचे अंगठे कापायचे. त्यानंतर त्यांची माळ बनवून त्यांना पुरस्कार मिळाल्याप्रमाणे ते परिधान करायचे. विशेषतः रानटी समाजात कवटीचे हारही प्रचलित होते. मध्ययुगीन भारतामध्ये इस्लामी आक्रमणकर्ते शहराच्या चौकांमध्ये पिरॅमिड, मीनार किंवा शिरांचे पर्वत बांधायचे. ‘शीर कापून बुरूज उभारा’, हा तुर्कांचा आवडता खेळ पराभूत शहरांच्या बाहेर नियमितपणे खेळला जात असे. असे म्हणतात की, घोरी, सिकंदर, बुट-शिकान आणि बख्तियार खिलजी यांना हा खेळ पुष्कळ आवडायचा. वर्ष १४०१ मध्ये बगदादवर ताबा मिळवणार्या निर्दयी तैमूरविषयी म्हटले जाते की, त्याने ९० सहस्र कवट्यांचे ‘पिरॅमिड’ बांधले होते. मृतकांची माळ बनवतांना त्यांना विलक्षण अघोरी आनंद मिळत असे. त्यामुळे मृतांची गणना करणे आणि वाचलेल्या पीडितांच्या चेतनेवर आणखी दहशत निर्माण करणे, हे दोन्ही उद्देश पूर्ण होत होते. फिरोजशाह तुघलक या अल्पवयीन मध्ययुगीन सुलतानाने एका आदिम पद्धतीचा अवलंब केला होता. ज्यामध्ये जिवंत पीडितांना मृतकांच्या शिरांची माळ घालण्यात येत होती. ती घालून त्यांना समाजात फिरवून त्यांची अधिक मानहानी करण्यात येत होती. त्यानंतर त्यांना ठार केले जात होते.
सुलतान त्यांच्या शाही दरबारात शत्रूचे डोके आणण्यासाठी सैनिकांना पुरस्कार देत असत. मृतकांच्या मूल्यांकनासाठी पुरस्काराची एक राशी ठरलेली होती. हेही शक्य आहे की, दरबारी इतिहासकारांनी त्यांच्या स्वामींना प्रसन्न करण्यासाठी मोठे आकडे सांगितले असतील. काही इतिहासकारांनी त्यांचे आजोबा, वडील आणि मित्र यांच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी असे पाहिले आहेत. परिणामी सामान्यतः फुगवून अनुमान काढले जाते. तथापि ही माहिती आधुनिक संशोधन कार्यात अतिशय महत्त्वाची आहे.
बहुतेक प्रकरणांमध्ये दोन आकडे अस्तित्वात असतात. एक म्हणजे पीडित समुदायाकडून प्रथेच्या रूपात सांगितलेले आणि दुसरे म्हणजे विजयी व्यक्तींनी अतिशयोक्तीपूर्ण सांगितलेले. दोघांमध्ये आणखीही आकडेवारी असू शकते. सर्वांत योग्य अनुमानापर्यंत पोचण्यासाठी कमाल आणि किमान आकडेवारीचा मध्य काढण्यासाठी भौमितिक मध्य (जिओमॅट्रिक मीन) वापरला जातो.
लेखक : श्री. अमित अग्रवाल, नवी देहली (२१.४.२०२३)