सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर उष्णतेमुळे होणारे शारीरिक त्रास दूर होणे
‘मला उष्णतेचा पुष्कळ त्रास होत होता. ‘डोळ्यांची जळजळ, तळहात आणि तळपाय यांची आग होणे, पित्त (अॅसिडिटी), शांत झोप न लागणे’ इत्यादी त्रासांमुळे माझी सारखी चिडचिड होत होती. मी या लक्षणांसाठी आयुर्वेदीय आणि अॅलोपॅथीचे औषधोपचार घेत होते; परंतु ती औषधे मला लागू होत नव्हती. मी उपाय म्हणून अनाहत आणि मणिपूर या चक्रांवर तळहाताची मुद्रा करून ‘निर्गुण’ हा नामजप करत होते; परंतु माझा त्रास न्यून होत नव्हता.
२२.८.२०२२ या दिवसापासून सद़्गुरु मुकुल गाडगीळकाका यांनी मला ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप प्रतिदिन १ घंटा करायला सांगितला. २ दिवसांमध्ये माझा ५० टक्के त्रास न्यून झाला. त्यानंतर मी औषधांसह हा नामजप एक मास चालू ठेवला. २५.१०.२०२२ या दिवशी माझा त्रास पूर्णतः नाहीसा झाला, तसेच माझी चिडचिड न्यून झाली. आता मला शांत झोप लागते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |