जन्मतःच सात्त्विकतेची ओढ असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. श्रीयान देवीप्रसाद पै (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. श्रीयान पै हा या पिढीतील एक आहे !
(‘श्रीयान’ या नावाचा अर्थ ‘श्रीविष्णु’, असा आहे.’ – संकलक)
वैशाख शुक्ल अष्टमी (२८.४.२०२३) या दिवशी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. श्रीयान देवीप्रसाद पै याचा पहिला वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याची आजी सौ. सीमा श्रीनिवास पै यांना त्याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
१ अ. सुनेचे पोट दुखल्यावर तिची तपासणी केल्यानंतर आधुनिक वैद्यांनी तिला लवकर गर्भधारणा होणार नसल्याचे सांगणे आणि तिने कुलदेवता अन् दत्त यांचा नामजप लिहिल्यावर १५ दिवसांनी ती गरोदर असल्याचे समजणे : ‘माझ्या सूनबाईला (सौ. सिद्धि देवीप्रसाद पै हिला) पोट दुखण्याचा त्रास होत होता; म्हणून कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे एका आधुनिक वैद्यांकडे नेल्यावर त्यांनी ‘तुम्ही ‘सोनोग्राफी’ करा. तुम्हाला लवकर गर्भधारणा होणार नाही’, असे सांगितले. नंतर घरी आल्यावर मी तिला कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप दिवसभरात ५ पाने लिहायला सांगितला. ती दिवसाला ५ पाने नामजप लिहायची; तसेच रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि विष्णुसहस्रनामही म्हणायची. आम्ही १५ दिवसांनी पुन्हा आधुनिक वैद्यांकडेे गेलो. त्यांनी ‘६ मास औषधे घ्यावी लागतील’, असे सांगितले. त्यामुळे आम्ही आमच्या गावी उडुपी येथे गेलो. तेथे आधुनिक वैद्यांना दाखवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ती गरोदर आहे आणि तिला दुसरा मास चालू आहे.’’
१ आ. त्यानंतर सौ. सिद्धि (माझी सून) तिची प्रसुती होईपर्यंत ‘नामजप लिहिणे, भगवद़्गीता आणि रामायण यांचे वाचन करणे अन् विविध स्तोत्रे म्हणणे’, असेे करत होती.
१ इ. विवाहापूर्वी कृष्णभक्त असलेल्या सुनेला गरोदरपणात ‘श्रीकृष्ण जन्माला येणार आहे’, असे वाटणे आणि गर्भारपणात तिने श्रीकृष्णाचे चित्र काढणे : माझी सून सौ. सिद्धि विवाहाच्या पूर्वीपासून श्रीकृष्णाची भक्ती करत असे. तिच्याकडे एक छोटीशी श्रीकृष्णाची मूर्ती होती. त्या मूर्तीला ती नेहमी म्हणायची, ‘मी कुठेही जाईन, तेथे तू माझ्या समवेत यायला हवास.’ गरोदरपणात त्रास होत असतांना तिला ‘श्रीकृष्ण जन्माला येणार आहे’, याची निश्चिती होती. गरोदर असतांना तिला चित्रे काढावीशी वाटायची. तेव्हा ती श्रीकृष्णाचे चित्र काढायची.
१ ई. श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर बसून नामजप करत असतांना मुलाला ‘एक लहान बाळ पत्नीच्या गर्भात जात आहे’, असे दिसणे : तिला दुसरा मास लागल्यावर आम्हाला समजले की, बाळाच्या हृदयाचे ठोके अल्प आहेत. तेव्हा माझा मुलगा (श्री. देवीप्रसाद (बाळाचे वडील)) श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर बसून नामजप करत असतांना त्याला ‘एक लहान बाळ पत्नीच्या (सौ. सिद्धीच्या) गर्भात जात आहे’, असे दिसले.
१ उ. चौथ्या मासात आम्ही स्तोत्र म्हणत असतांना पोटातील बाळाला आनंद होऊन ते अधिक हालचाल करू लागायचे.
१ ऊ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत असतांना ‘दत्तगुरूंनी साधिकेच्या मांडीवर एक बाळ ठेवले आहे’, असे जाणवणे आणि हे ऐकून कुटुंबियांची भावजागृती होणे : पितृपक्षात आम्ही सर्व जण ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करायला बसलो होतो. तेव्हा आम्ही गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘सिद्धीच्या गर्भाला जी अडचण असेल, ती निघून जाऊ दे. बाळाचे पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होऊ दे.’ तेव्हा आमचा नामजप भावपूर्ण झाला. एकदा आमचा नामजप चालू असतांना ‘दत्तगुरूंनी माझ्या मांडीवर एक बाळ ठेवले आहे’, असे मला जाणवले. मी डोळे उघडून बघितल्यावर सर्व जण नामजप करत होते. नामजप झाल्यावर मी घरातील सर्वांना ही अनुभूती सांगितली. त्या वेळी सर्वांची भावजागृती झाली.
२. जन्मानंतर
अ. सिद्धीची प्रसुती झाल्यावर ती श्रीयानला प्रथमच दूध पाजत होती; पण तो दूध पित नव्हता. तेव्हा श्रीकृष्णाचा नामजप केल्यावर तो लगेच दूध पिऊ लागला.
आ. त्याचे हात नेहमी नमस्काराच्या मुद्रेतच असायचे.
३. वय १ ते ४ मास
अ. श्रीयान १ मासाचा असतांना आम्ही ‘विठू माऊली, तू माऊली जगाची’, हे भजन भावपूर्ण म्हणत असतांना ते ऐकत रहायचा.
आ. चौथ्या मासात ‘तो प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चित्राकडे पाहून त्यांच्याशी बोलत आहे’, असे वाटायचे.
इ. त्याला तेल लावून अंघोळ घालत असतांना मी प्रतिदिन ‘श्रीकृष्णाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवत असे. तेव्हा तो शांत रहात असे. ही सेवा करतांना माझ्या मनात कधी नकारात्मक विचार आले, तर तो जोरात रडत असे.
४. वय ९ मास ते १ वर्ष
४ अ. श्रीयान ९ मासांचा असतांना ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय ।’, असे म्हटल्यावर हाताची मूठ करून हात वर करत असे.
४ आ. सात्त्विकतेची ओढ
१. श्रीयानला परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे नेल्यावर तो त्यांच्या चेहर्यावर आपला चेहरा ठेवून हसायचा.
२. साधकांचा भ्रमणभाष आला, तर तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा; मात्र नातेवाइकांचा भ्रमणभाष आल्यावर तो बोलण्याचा प्रयत्न करत नसे.
३. एकदा श्रीयानला अंघोळ घालत असतांना तो मोठ्याने रडत होता. त्या वेळी भ्रमणभाषवर सद़्गुरु स्वातीताई (सद़्गुरु स्वाती खाडये) यांचा सत्संग चालू होता. सद़्गुरु स्वातीताईंचा आवाज ऐकल्यावर तो शांत राहून त्याच दिशेला बघू लागला.
४. एकदा श्रीयानला पिंगुळी (कुडाळ) सेवाकेंद्रात आणले होते. तेव्हा तो सद़्गुरु स्वातीताईंकडे लगेच गेला.
४ इ. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी चि. श्रीयान सात्त्विक असल्याचे सांगणे : श्रीयान १० मासांचा असतांना सद़्गुरु स्वाती खाडये आणि सद़्गुरु सत्यवान कदम आमच्या घरी आले होते. तेव्हा बाळाला घेतल्यावर सद़्गुरु स्वातीताई म्हणाल्या, ‘‘बाळ सात्त्विक आहे.’’
४ ई. जेव्हा सद़्गुरु सत्यवानदादा आमच्या घरून जाण्यास निघाले, तेव्हा श्रीयान रडू लागला. त्या वेळी सद़्गुरु सत्यवानदादांनी त्याला थोडा वेळ मांडीवर घेतले. त्यानंतर तो शांत झाला आणि नंतर माझ्याकडे आला.’
– सौ. सीमा श्रीनिवास पै (चि. श्रीयानची आजी), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१९.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |