जलशुद्धीकरण केंद्राच्या गळती काढण्याच्या कामामुळे १ मेला पाणीपुरवठा होणार नाही !
कोल्हापूर – जलशुद्धीकरण केंद्राच्या गळती काढण्याच्या कामामुळे १ मे या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ मे या दिवशी अपुरा पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.