कुख्यात गुंड अतिक अहमद याने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले होते !
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांचा दावा !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील हनुमान गढी मंदिराचे महंत राजू दास यांनी दावा केला आहे की, कुख्यात गुंड अतिक अहमद हा धर्मांतराचे कार्य करत होता. ‘त्याने आतापर्यंत १२ हिंदूंचे धर्मांतर केले होते’, एवढीच माहिती उपलब्ध असली, तरी त्याने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले आहे, ही वस्तूस्थिती आहे. जे हिंदु गुंड त्याच्या समवेत काम करत होते, त्यांचे त्याने धर्मांतर केले होते. यात गुड्डू मुस्लिम या त्याच्या गुंडाचाही समावेश आहे. त्याचे पूर्वीचे नावे आयुष चौधरी होते.
राजू दास यांनी म्हटले की, अतिक अहमद याला ठार मारायला नको होते; कारण त्याच्या मृत्यूमुळे अनेक गोपनीय गोष्टी उघड होऊ शकल्या नाहीत. यामुळे काही पांढरपेशे उघडे पडण्यासासून वाचले आहेत.
संपादकीय भूमिकाआता मुसलमान गुंडांचाही धर्मांतर जिहाद ! |