जागतिक वारसास्थळ असलेले लोणार सरोवर पुष्कळ प्रदूषित !
सरोवरात १६ प्रकारच्या सूक्ष्म प्लास्टिक कणांचे अस्तित्व आढळले
पुणे – सुमारे ५ लाख वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले आणि जागतिक वारसास्थळ असलेले लोणार सरोवर पुष्कळ प्रदूषित झाले आहे. प्लास्टिक आणि त्याचे सूक्ष्मकण यांमुळे तेथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. सरोवरात १६ प्रकारच्या सूक्ष्म प्लास्टिक कणांचे अस्तित्व असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. येथील प्रदूषणाचा अभ्यास ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ आणि मुंबईतील ‘महाराष्ट्र कॉलेज’ यांनी केला आहे. प्रा. सचिन गोसावी आणि प्रा. समाधान फुगे यांचा संशोधनात सहभाग होता.
‘लोणार सरोवर परिसरातील सीतान्हाणी या पवित्र कुंडात स्नान करण्यासाठी यात्रेकरूंचा मोठ्या प्रमाणात तेथे वावर असतो; पण सरोवरातील वाढत्या प्रदूषणामुळे तेथील जीवसृष्टी आणि जैवरासायनिक प्रक्रिया यांना धोका निर्माण झाला आहे’, असे प्रा. फुगे यांनी सांगितले.
प्लास्टिक प्रतिबंधाची आवश्यकता !
लोणार सरोवर परिसरात येणारे यात्रेकरू आणि पर्यटक यांसाठी प्लास्टिक प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम या संदर्भात जागरूकता अभियान राबवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी शासन आणि वन विभागाने समन्वयातून सरोवर परिसरात प्लास्टिकच्या वापराला योग्य तो प्रतिबंध घातला पाहिजे, असेही तज्ञांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|