७ सहस्र ५०० झाडांच्या कत्तलीविरोधात तरुणांचे पुणे येथे ‘चिपको’ आंदोलन !
पुण्यातील नदी सुधार प्रकल्पात झाडे तोडण्यास नागरिकांचा विरोध
पुणे – येथील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडे तोडण्यात येणार आहेत. या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. नदी सुधार प्रकल्पात जी झाडे तोडण्यात येणार आहेत, त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी २९ एप्रिल या दिवशी येथील जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी ५ वाजता चिपको आंदोलन केले. सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या ‘चिपको’ आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनाच्या काळात करण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाडांना सर्व आंदोलनकर्त्यांनी मिठी मारून आंदोलन केले.
सौजन्य एबीपी माझा
संपादकीय भूमिकानागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी ! |