सहकार भारतीची आज आणि १ मे या दिवशी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ! – विवेक जुगादे
कोल्हापूर, ३० एप्रिल (वार्ता.) – सहकारात संस्कार आणणे आणि प्रशिक्षण देणे यांसाठी मुख्यत्वेकरून कार्यरत अशा, तसेच सहकार क्षेत्रासाठी गेली ४५ वर्षे काम करणार्या सहकार भारतीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी कणेरी मठ येथे होत आहे. ३० एप्रिलला सकाळी १० वाजता याचे उद्घाटन होत असून त्यासाठी आमदार श्री. प्रकाश आवाडे, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरु, प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री श्री. विवेक जुगादे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प्रदेश सहसंघटनप्रमुख श्री. संजय परमणे, श्री. जवाहर छाबडा आणि वैशाली आवाडे उपस्थित होत्या.
१. वर्षातून २ वेळा प्रदेश कार्यकारिणीची बैठक होते. यात सहकार क्षेत्रातील विविध समस्यांवर चिंतन होणार आहे. सहकार भारती सहकारात प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यरत असून वर्षभरात १० सहस्र कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.
२. सहकार क्षेत्रातील विविध समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सहकार भारती प्रयत्नशील असून सहकार भारतीच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय पातळीवर स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले.
३. सहकार भारती सातत्याने करत असलेल्या प्रबोधनामुळे या क्षेत्रात नवीन, तसेच तरुण वर्गही सहभागी होत आहे.