पाकिस्तानमध्ये मृत तरुणींच्या कबरीवर जाळी लावून ठोकले जात आहे टाळे !
मृतदेहावर बलात्कार होण्याची भीती !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये काही दिवसांमध्ये मृत तरुणी आणि महिला यांच्या कबरीतून त्यांचा मृतदेह काढून त्यांच्यावर बलात्कार करण्याच्या काही घटना घडल्या आहेत. यामुळे आता मृत तरुणी आणि महिला यांच्या कबरींना लोखंडी जाळ्या लावून त्याला टाळे ठोकण्यात येत आहे, तसेच काही ठिकाणी, तर मृतांचे नातेवाईक पहाराही देत आहेत. इतकेच नव्हे, तर मृतदेह लवरात लवकर कुजण्यासाठी त्यांवर मोठ्या प्रमाणात मीठ टाकले जात आहे.
१. मृतदेहांवर बलात्कार करण्याच्या घटना कराची आणि अन्य काही शहरांमध्ये घडल्या आहेत. सिंध प्रांततील एका गावात १४ वर्षांच्या मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्याच्यावर बलात्कार करण्यात आला होता.
२. पाकिस्तानमध्ये वर्ष २०११ मध्ये एक प्रकरण समोर आले होते. यात उत्तर नजीमाबाद (कराची) येथे महंमद रिझवान या कब्रस्तानच्या सुरक्षारक्षकाने ४८ मृत महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याचे मान्य केले. त्याला नंतर अटक करण्यात आली.
३. पाकिस्तानमधील ‘डेली टाइम्स’च्या वृत्तानुसार अशा प्रकारच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे मृतांचे पालक कबरीचे संरक्षण करत आहेत.
४. ‘जमियत उलाम-ए-इस्लाम पाकिस्तान’चे मौलाना (इस्लामचे अभ्यासक) राशिद यांनी म्हटले की, जिवंत असतांना महिला स्वतःवर आसुरी दृष्टी ठेवणार्यांपासून स्वतःचा बचाव करत रहातात; मात्र आता ही गोष्ट त्यांच्या कबरीपर्यंत पोचली आहे. हे भयानक आणि देशाला लज्जास्पद आहे. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे.
संपादकीय भूमिका
|