गोवा : पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता यांचे स्थानांतर
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकरण
पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याच्या प्रकरणी पणजी महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता यांचे पोलीस मुख्यालयात ‘लाईन ड्युटी’साठी स्थानांतर करण्यात आले आहे. पोलीस खात्याने या प्रकरणी आगशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची पोलीस विभागाला सक्त ताकीद; म्हणाले अशी प्रकरणे…#Goa #Police #Crime #CMSawant #DainikGomantak https://t.co/JmoIw02j83
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) April 29, 2023
वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते सेवेतून निलंबित
एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रथम दर्शनी अहवाल नोंदवण्यास विलंब केल्याच्या प्रकरणी पोलीस खात्याने वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांना सेवेतून निलंबित केले आहे.
संपादकीय भूमिका
|