ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)
ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ? पूर्वीच्या काळी तर उपजीविकेसाठी सरकारी चाकरी नव्हती. ब्राह्मणांनी संपूर्ण फर्निचर व्यवसाय सुतारांना दिला. टेक्सटाईलचे काम शिंप्यांना दिले. शस्त्र बनवण्याचे काम लोहारांना दिले. पानविक्रीचे काम बारीला दिले. सुपाचे काम धरिकारला दिले. बांगड्यांचा व्यवसाय कासारांना दिला. मांसाचा व्यवसाय खाटिकांना दिला. फुलांचा व्यवसाय माळ्यांना दिला. तेलाचा व्यवसाय तेलींना दिला. त्यामुळे सर्वांना रोजगार मिळाला. या सार्या सन्माननीय व्यवसायांना राज्यघटनेने मागास बनवले आहे. ब्राह्मणांनी स्वत:साठी भिक्षा मागणे आणि नि:शुल्क अध्यापनाचे कार्य ठेवले. शेवटी सर्व व्यवसायांमुळे भारत संपूर्ण विश्वात ‘सोनेकी चिडिया’ झाला.’