‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्ष २०१२ ते २०२२ या कालावधीत दहा ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशने’ यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. यावर्षी १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’) आयोजित करण्यात आले आहे. गोव्यात होणार्या या महोत्सवात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योगपती, लेखक आदी सहभागी होणार आहेत. अधिवेशनात भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, सिंगापूर, बँकॉक, अमेरिका, फिजी, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, इंग्लंड, मलेशिया इत्यादी देश-विदेशांतून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !
या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशुरांनी सढळ हस्ते दान द्यावे. या धर्मदानावर ‘८० जी (५)’ अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकते. धनादेश ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) या नावे स्वीकारले जातील.
खालील लिंकच्या माध्यमातून अधिवेशनासाठी अर्पण करू शकता.
https://www.hindujagruti.org/summit/donate
संपर्क : ९५७९२ ८८०१०