मित्रासमवेत दुचाकीवरून जाणार्या मुसलमान तरुणीच्या अपहरणाचा धर्मांधांचा प्रयत्न !
|
छत्रपती संभाजीनगर – मोंढा नाका परिसरातील ‘स्पा सेंटर’च्या व्यवस्थापकासमवेत दुचाकीवर असलेल्या मुसलमान तरुणीला धर्मांधांनी रस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करत तिचे रिक्शातून अपहरण केल्याची घटना २८ एप्रिल या दिवशी घडली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी अरबाज जाकीर कुरेशी (वय २२ वर्षे) या धर्मांधाला कह्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. ही तरुणी हिंदु तरुणासमवेत जात असल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे समजते.
१. येथे आकाशवाणी केंद्राच्या पुढे एका बड्या कपड्याच्या दालनामागे मोठे ‘स्पा सेंटर’ आहे. येथे अन्य शहरातील २० ते २२ वर्षांच्या २ तरुणी त्यांच्या अन्य दोन मैत्रिणींसह ‘ब्यूटिशियन’ (सौंदर्य वर्धनालयात काम करणारी महिला) म्हणून काम करतात.
Chhatrapati Sambhaji Nagar: 3 men harass Muslim girl for hanging out with a Hindu man; case filed#ChhatrapatiSambhajinagar #Islam #Hindu https://t.co/1IjXRy43b3
— Organiser Weekly (@eOrganiser) April 27, 2023
२. उत्तरप्रदेशचा स्वयमसिंग कुमार सिंग हा या ‘स्पा सेंटर’चा व्यवस्थापक म्हणून काम करतो. तेथे अन्य मुलीही काम करतात. त्या सर्व सिंधी कॉलनीत खोलीत रहातात.
३. २८ एप्रिल या दिवशी सकाळी ११.३० वाजता एक तरुणी नवीन सीमकार्ड खरेदी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे घेण्यासाठी तिचा मित्र स्वयमसिंग समवेत दुचाकीवरून सिंधी कॉलनीत तरुणीच्या खोलीवर गेले.
४. तेव्हा तरुणीच्या इतर मैत्रिणी खोलीवर होत्या. कागदपत्रे घेऊन तरुणी आणि स्वयमसिंग दुचाकीवरून निघाले. अन्य ४ मैत्रिणी रिक्शाने ‘स्पा सेंटर’च्या दिशेने निघाल्या.
५. तरुणी आणि स्वयमसिंग दोघेही मोंढा उड्डाणपुलाखालून जात असतांना अचानक २ धर्मांध दुचाकीस्वारांनी त्यांचा रस्ता अडवला आणि तरुणीला ‘हमारे साथ चलो, नहीं तो काट डालेंगें’ अशी धमकी देत तिचा पाठलाग चालू केला.
६. स्वयमसिंग याने दुचाकीचा वेग वाढवून त्याच्या कार्यालयाच्या इमारतीसमोर पोचला. तेथे मुलींचीही रिक्शा थांबली. स्वयमसिंग याने तरुणीला तात्काळ आत जाण्यास सांगितले. तोपर्यंत तेथे आणखी ६-७ धर्मांध धावत आले.
७. ‘ये लडकी इधर क्या कर रही है, इसको हमारे साथ भेजो’ असे म्हणत धर्मांधांनी त्या तरुणीला पकडून रिक्शात ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावर तरुणीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला.
८. मात्र दोघांनी तिला रिक्शात बसवून चालकाला रिक्शा पुढे नेण्यासाठी धमकावले. स्वयमसिंग याला काय चालू आहे ?, हे कळेपर्यंत रिक्शा गेली. त्याने तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून साहाय्य मागितले.
९. पोलिसांनी त्यांना जिन्सी पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस कारवाई चालू करत असतांनाच काही वेळातच तरुणीला घेऊन रिक्शाचालक पोलीस ठाण्यात पोचला.
१०. पोलिसांनी तरुणीची चौकशी केली. ती प्रचंड घाबरलेली होती. तिने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. अपहरणकर्त्यांनी चालकाला रिक्शा भडकल प्रवेशद्वार आणि नंतर बुढीलेन परिसरात नेण्यास सांगितली.
११. सिटी चौकाच्या दिशेने जात असतांना पोलिसांचा दूरभाष येत असल्याने अपहरणकर्ते अचानक रिक्शातून खाली उतरले. रिक्शामागे दुचाकीवरून जाणारे धर्मांध पळून गेले. त्यामुले रिक्शाचालकाने तरुणीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्या तरुणीने अपहरणकर्त्यापैकी एकालाही ओळखत नसल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिका
|