मुंबई विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ८ मासांपासून पाणीच नाही !
|
मुंबई – जागतिक दर्जाच्या मुंबई विद्यापिठातील धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतीगृहात गेल्या ८ मासांपासून पाणी नाही. त्यामुळे तेथील ७० विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्या आहेत. (तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक) त्यामुळे विद्यार्थिनींनी या विरोधात आंदोलन केले.
Eight months on, Mumbai University’s girls’ hostel has no water
Via: @diptivsingh #MumbaiUniversity #Hostel #Water #Mumbai #SantaCruz #MumbaiNews #NewsUpdate https://t.co/d1efshCGoK
— Mid Day (@mid_day) March 25, 2023
मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार ! – संपादक)
संपादकीय भूमिकापाण्याअभावी विद्यार्थिनींना आंदोलन करावे लागणे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद ! |