इस्लामचा अवमान करणार्‍या चिनी नागरिकाला पाकच्या न्यायालयाकडून जामीन संमत !

पोलिसांनी खोटा गुन्हा नोंदवल्याचा न्यायालयाचा निर्वाळा

जामीन संमत झालेला चिनी नागरिक (मध्यभागी)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – इस्लामचा अवमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिकाची आतंकवादविरोधी पथकाच्या न्यायालयाने २ लाख रुपयांच्या जामिनावर सुटका केली. त्याच्या सुटकेनंतर त्याला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे.  न्यायालयाने म्हटले की, कोहिस्तान पोलिसांनी या नागरिकाच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवला आहे. ही व्यक्ती सराईत गुन्हेगार नाही, त्यामुळे तिला जामीन दिला.

याच वर्षी १६ एप्रिल या दिवशी पाकिस्तानी कामगारांनी डासू जलविद्युत् प्रकल्पावर काम करणार्‍या या चिनी नागरिकाविरुद्ध त्याने इस्लामचा अवमान केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. (पाकिस्तानी कशा प्रकारे अन्य धर्मियांच्या विरोधात खोटे आरोप करून त्यांचा काटा काढतात, हे जाणा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असेच खोटे गुन्हे नोंदवून पाकमधील अल्पसंख्य हिंदूंना जाणीवपूर्वक कारागृहात टाकून त्यांना शिक्षा करण्यात आली आहे. याविषयी पाकच्या न्यायालयाने वस्तूनिष्ठ चौकशी केली पाहिजे !