नायजेरियामध्ये इस्लामी आतंकवाद्यांकडून एका आठवड्यात १३४ ख्रिस्त्यांची हत्या !
आबुजा (नायजेरिया) – नायजेरियामध्ये इस्लामी आतंकवाद्यांनी एका आठवड्यात १३४ ख्रिस्त्यांची हत्या केली आहे. नायजेरियातील सशस्त्र जिहादी आतंकवादी बर्याच काळापासून काही राज्यांतील ख्रिस्त्यांवर आक्रमण करत आहेत. ५ एप्रिल या दिवशी या आतंकवाद्यांनी उमोगिडी गावावर आक्रमण करून ५२ ख्रिस्त्यांची, तर ७ एप्रिल या दिवशी एनगबानने गावावर आक्रमण करून ३८ ख्रिस्त्यांची हत्या केली.
इस्लामी आतंकियों ने एक हफ्ते में मारे 134 ईसाई, पादरी को घर में घुसकर मार डाला: नाइजीरिया में इस साल 1000 ईसाइयों की हो चुकी है हत्या#Nigeria #RadicalIslamisthttps://t.co/PojKS7dG5V
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 28, 2023
घरात घुसून पाद्य्राची हत्या !
आतंकवाद्यांनी येथे एका पाद्य्राची त्याच्या घरात घुसून हत्या केली, अशी माहिती नायजेरियातील नेते सलामतू बिल्ली यांनी दिली. पाद्य्राची हत्या केल्यानंतर आतंकवाद्यांनी निझमतिलो, पुलका, अझिरी माफाआदी ख्रिस्तीबहुल गावांमध्ये आक्रमण केल्याचीही माहती बिल्ली यांनी दिली.
संपादकीय भूमिका‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे सतत बरळणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? |