बैठकीला भगवा सदरा घालून आलेल्या काँग्रेसच्या माजी पदाधिकार्याला काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून मारहाण !
काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप फेटाळला !
अमेठी (उत्तरप्रदेश) – युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अखिलेश शुक्ला हे भगवा सदरा घालून काँग्रेस पक्षाच्या बैठकीला गेल्यामुळे त्यांना काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी मारहाण केली. मारहाण करणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्ला यांना ‘भाजपवाला’ ठरवत ही मारहाण केली. या प्रकरणी शुक्ला यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल, युवक काँग्रसचे जिल्हाध्यक्ष शुभम सिंह, समीर बृजेंद्र सिंह आदींनी ही मारहाण केली. लोखंडी सळीने मारहाण करत शुक्ला यांच्याकडील २३ सहस्र ४०० रुपये काढून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सौजन्य: Aaj Tak
शुभम सिंह यांनी शुक्ला यांचे आरोप फेटाळत ‘शुक्ला यांनीच शिवीगाळ करत लाठीने मारहाण केली’, असा आरोप केला. भगवा सदरा घातल्यामुळे मारहाण करण्यात आल्याचा दावा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाभगव्या रंगाची अॅलर्जी झालेले काँग्रेसवाले हिंदु कि धर्मांध ? अशा काँग्रेसवाल्यांना पाकमध्येच पाठवून देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |