गोवा : पर्वरी येथे क्रिकेटवर सट्टा खेळणार्या दलालांच्या टोळीला अटक
पणजी – क्रिकेटवर सट्टा खेळणार्या दलालांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून पर्वरी येथून अटक केली. या टोळीकडून सट्टा चालवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे पोलिसांनी कह्यात घेतली आहेत.
IPL betting racket busted in Goa, 14 held https://t.co/jJ7XdF5Rpx
— TOI Cities (@TOICitiesNews) April 28, 2023
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश छत्तीसगड येथील २० वर्षे वयाच्या युवकांचा समावेश आहे. पोलिसांनी ३८ सहस्र रुपये रोख, ४७ भ्रमणभाष संच, १ लॅपटॉप, ३ टिव्ही, ३ राउटर, ३ टाटा स्काय टिव्ही प्रक्षेपण संच मिळून २५ लाखांचा ऐवज जप्त केला.