रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्यावर जाणवलेली सूत्रे
१. अनेक सेवा करण्यास शिकल्याने आनंद मिळणे
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यापासून मला सगळ्या सेवा करण्यास आनंद वाटतो. मी सर्व सेवा शिकण्याचा प्रयत्न करतो; कारण आपत्काळ आला किंवा दळणवळण बंदी आली, तर मला कुठेही अन् कधीही सेवा करता येईल. त्या वेळी माझ्या मनावर ताण येणार नाही.
२. कृतज्ञताभावाने गाडी चालवण्याची सेवा करणे
गाडी चालवण्याची सेवा करतांना मी सतत कृतज्ञताभावात असतो; कारण मला साधकांना घेऊन जाण्याची संधी मिळते. मी गाडी दुरुस्त करण्यासही शिकलो आहे.
३. ‘साधकच आपले खरे आध्यात्मिक नातेवाईक आहेत’, असे वाटणे
आश्रमात आल्यापासून मला घरी जावेसे वाटत नाही. मला सर्व साधक आपले वाटतात. साधकच माझी घरच्यांसारखी काळजी घेत मला प्रेम देतात. माझे घर आश्रमापासून दीड घंट्याच्या अंतरावर असूनही मला घरी जाण्याची इच्छा होत नाही. नातेवाइकांनी बोलावले, तरी मला आश्रमात राहून सेवा करावीशी वाटते. ‘साधकच आपले खरे आध्यात्मिक नातेवाईक आहेत’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.’
– श्री. सूरज परशुराम पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फेब्रुवारी २०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |