परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता सावंत यांना आलेल्या अनुभूती
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव ‘रथोत्सव’ स्वरूपात साजरा करण्यात आला. या रथोत्सवाच्या वेळी फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. सुजाता सूर्यकांत सावंत यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे देत आहोत.
१. रथोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रथामध्ये पाहिल्यावर श्रीरामाच्या दर्शनामुळे शबरीला झालेल्या आनंदाप्रमाणे आनंदावस्था अनुभवणे
‘वैशाख कृष्ण सप्तमी (७.५.२०१८) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७६ वा जन्मोत्सव सोहळा झाला होता. महर्षींच्या आज्ञेप्रमाणे या सोहळ्यात परात्पर गुरुदेवांचे शेषशायी श्रीविष्णूच्या रूपात दर्शन झाले होते. या सोहळ्याच्या वेळी त्यांनी श्रीविष्णूचे वस्त्रालंकार परिधान करून साधकांना दर्शन दिले. तेव्हापासून मी परात्पर गुरुदेवांना त्याच रूपात माझ्या मनात आणि डोळ्यांत साठवून ठेवले होते.
वर्ष २०२२ मध्ये महर्षींच्या आज्ञेने रथोत्सव सोहळा झाला. रथोत्सवाच्या वेळी परात्पर गुरुदेवांना रथामध्ये आरुढ झालेले पाहिल्यावर मला श्रीमन्नारायण रूपातील गुरुदेवांची आठवण होऊन माझी पुष्कळ भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते. श्रीरामाने अनेक वर्षांनंतर शबरीला दर्शन देऊन तिने दिलेली उष्टी बोरे खाल्ली. त्या वेळी शबरीला किती आनंद झाला असेल ! अगदी तसाच आनंद मलाही झाला होता.
२. परात्पर गुरुदेव आणि सद्गुरुद्वयी यांना रथात बसलेले पाहून ‘सर्व देवता पृथ्वीवर अवतरल्या आहेत आणि त्या रथातून सर्वांना दर्शन देत आहेत’, असे जाणवणे
‘देवाला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) विविध आभूषणे आणि वस्त्रे परिधान केलेल्या रूपात रथात बसलेले पाहून, तसेच त्यांच्या समवेत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुद्वयींना पाहून ‘जणू सर्व देवता पृथ्वीवर अवतरल्या आहेत आणि त्या रथातून सर्वांना दर्शन देत आहेत’, असे मला जाणवले. जेव्हा एवढ्या गर्दीतूनही श्रीमन्नारायणाची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) दृष्टी माझ्यावर पडली, तेव्हा तर ‘मी कृतार्थ झाले’, असे मला वाटलेया लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
३. रथोत्सवाच्या सोहळ्यानंतर ३ दिवस मी तो रथोत्सव मानसरित्या अनुभवत होते. रथोत्सवामुळे मला भावावस्थेत रहाता येत आहे.
४. ही अनुभूती लिहितांनासुद्धा हा रथोत्सव सोहळा मानसरित्या अनुभवून माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत आहेत.
ही अनुभूती दिल्याबद्दल परात्पर गुरुदेव आणि सद्गुरुद्वयी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुजाता सूर्यकांत सावंत, फोंडा, गोवा. (२६.५.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |