सूरज पांचोली यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता !
अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरण
मुंबई – अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे. १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला. सूरज पांचोली यांच्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचे अन्वेषण आधी मुंबई पोलीस करत होते. नंतर सीबीआयकडे सोपवले. ३ जून २०१३ या दिवशी जिया खान हिने मुंबईतील जुहू येथील रहात्या इमारतीत आत्महत्या केली. तिने लिहिलेल्या चिठ्ठीत सूरज यांच्यावर आरोप केले होते.
जिया खान प्रकरणात सुरज पंचोली ला उच्चन्यायालयाचा दिलासा – प्रशांत पाटील वकील#JIahKHanCase pic.twitter.com/nxiMLvuqMm
— RNO | Right News Online मराठी (@RNO_OfficialM) April 28, 2023