ख्रिस्त्यांमधील अंधश्रद्धा !
३ दिवसांपूर्वी केनियातून बातमी आली की, तेथे येशूला भेटण्यासाठी स्थानिक पाद्य्राच्या सांगण्यावरून लोकांनी अनेक दिवस उपवास करून स्वत:ला भूमीत दफन करून घेतले. यामध्ये ४७ लोकांचा मृत्यू झाला. नैरोबी येथील एका जंगलात हे सर्व प्रकार घडले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेत ४७ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र संबंधित पाद्री पॉल याने घुमजाव करत ‘मी कुणालाही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही. मी चर्च बंद केले आहे’, असे सांगितले. खरेतर एवढी मोठी घटना घडल्यावर मोठा गदारोळ व्हायला हवा होता; मात्र तसे झाले नाही. सारे काही शांत शांत आहे. खारघर येथील प्रसिद्ध निरूपणकार ‘पद्मश्री पुरस्कार प्राप्त पू. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात उष्माघाताने काही श्री सेवकांचा मृत्यू झाल्यावर ‘पू. आप्पासाहेब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा’, असे पुरो(अधो)गाम्यांकडून सांगितले गेले. जागतिक पातळीवर घडलेल्या या मोठ्या घटनेत जाणीवपूर्वक ख्रिस्त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी का करण्यात आली नाही ? कुठल्याही इंग्रजी दैनिकात याविषयी ख्रिस्ती पंथांच्या अंधश्रद्धा उघड करणारे, पाद्य्रांच्या अनैतिक आणि निर्बुद्ध वर्तणुकीवर प्रकाश टाकणारे लेख का प्रसिद्ध झाले नाहीत ?
प्रसिद्धीमाध्यमे गप्प का ?
यापूर्वीही टांझानिया येथे तेथील एका पाद्य्राने कोरोना महामारीच्या काळात येशूचे तीर्थ म्हणून लोकांना बरे करण्यासाठी कीटकनाशक पाजले होते. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची केवळ बातमी मिळाली; मात्र त्याविषयी चर्चासत्रे, गदारोळ काहीच झाला नाही. अत्यंत शांतपणे ही घटना विसरण्यात आली. कन्याकुमारीत तर स्वत: ‘येशूचा अवतार आहे’, असे सांगून तेथील आर्चबिशपने ८० हून अधिक महिलांशी संबंध ठेवले आणि त्यांचे २०० व्हिडिओही बनवलेे. या घटनेचीही चर्चा नाही. ख्रिस्त्यांच्या या अंधश्रद्धांना काय म्हणावे की, ज्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत, तसेच महिलांचे शील भ्रष्ट होत आहे ? जगात १५७ ख्रिस्ती देश आहेत. या देशांमधील किती सुधारणावादी किंवा बुद्धीवादी यांनी या घटनेचा निषेध नोंदवला ? किती जणांनी पाद्य्राच्या अटकेची मागणी केली ? भारतात हिंदु धर्मीय संतांकडून अथवा एखाद्या हिंदु परंपरेच्या पालनामुळे कुणाला खरचटले, तरी येथील पुरो(अधो)गामी संत आणि परंपरा यांवर, हिंदु परंपरेवर यथेच्छ टीका करतात. ‘ही बुरसटलेली प्रथा पालटली नाही, तर समाजात किती मोठे दुष्परिणाम होतील ?’, असा आव आणला जातो. शासन-प्रशासन यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली जाते. (अंध)श्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणार्या काही समित्या हिंदूंना आव्हान देतात. त्यांच्या हास्यास्पद आवाहनाला येथील टी.आर्.पी.साठी आसुसलेली माध्यमे मोठी प्रसिद्धी देतात. त्यामुळे ‘तोच एक ज्वलंत विषय आहे कि काय ?’, असे दर्शकांना वाटू लागते.
मध्यंतरी सामाजिक माध्यमांवर काही व्हिडिओ प्रसारित झाले. मराठी नाव धारण केलेली मुंबईच्या उपनगरांमध्ये रहाणारी आणि चालण्यास अडचण असलेली, सातत्याने चाकांच्या आसंदीचा आधार घ्यावा लागणारी महिला एका प्रार्थनासभेत येते. तिच्यासाठी पाद्री प्रार्थना करतात आणि ती हळूहळू केवळ चालतच नाही, तर उड्या मारते, नाचते, धावते, असे दाखवले. येशूच्या प्रार्थनेच्या नावाखाली या तथाकथित चमत्काराला सामाजिक माध्यमांवर लोकांनी आक्षेप घेतला; मात्र प्रसारमाध्यमांनी हा विषय का हाताळला नाही ? ‘ती महिला खरोखरच चालू शकत नव्हती का ?’, ‘तिला शारीरिक त्रास होते का ?’, हे प्रश्न का विचारले नाहीत ? संबंधित पाद्य्राचा ठावठिकाणा शोधून काढून त्यांना ‘तुम्ही हा चमत्कार कसा केला ?’, ‘याचे शास्त्र काय ?’, असे प्रश्न विचारून सत्य जनतेसमोर का आणले नाही ?’, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होतात.
या सर्वांची गोळाबेरीज एकच वाटते, ती म्हणजे ख्रिस्त्यांची अशी कितीही प्रकरणे उघडकीस आली, तरी त्यावर काही बोलायचे नाही. ख्रिस्त्यांमध्ये अशी अंधश्रद्धा चालेल; मात्र हिंदूंमध्ये ती चालणार नाही. विदर्भातील एका महाराजांनी योगीक क्रियांच्या सामर्थ्यावर पाण्यावर तरंगण्याचा प्रकार करून दाखवल्यावर त्वरितच अंनिसने प्रतिक्रिया व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर जाहीर आव्हान देऊन दुसर्या दिवशीच कार्यकर्ता पाण्यात उतरवला. तो पाण्यात बुडाल्यामुळे अंनिसची फजिती झालीच; मात्र ते मान्य करणार, ती अंनिस कुठली ?
अंनिस अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करते, असे समजणे, हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे. ‘येशूच्या प्रार्थनेने कर्करोग, एड्स यांसारखे गंभीर आजार बरे होतात’, असा दावा करणार्या ख्रिस्ती संस्थांच्या मागे अंनिस का लागत नाही ? असाध्य आजार, अडचण दूर करण्याचे दावे करणार्यांचे बिंग का फोडले जात नाही ?
पाद्य्रांचा खोटेपणा उघड करावा !
ख्रिस्त्यांमधील अशा विविध अंधश्रद्धा वेळोवेळी उघड झाल्या आहेत. गोव्यात धर्मांतर करतांना ज्या हिंदु महिलांनी धर्मांतर करण्यासाठी नकार दिला, त्यांना ‘चेटकीण’, असे संबोधून जिवंत जाळण्यात आले, त्यापूर्वी त्यांचे स्तन उपटणे, केस काढणे असे निर्घृण प्रकार करण्यात आले. त्याविषयीही पुष्कळ अल्प जणांना ठाऊक आहे. ख्रिस्ती पंथातील अनेक अंधश्रद्धा, ख्रिस्ती पंथियांच्या अध्यात्मविषयक शंकांचे निरसन न करू शकणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ न शकणे या कारणांमुळे ख्रिस्त्यांचा त्यांच्या पंथावरील विश्वासच उडत चालला आहे. ‘अमेरिकेत गेल्या ५० वर्षांत ख्रिस्त्यांची संख्या २६ टक्क्यांनी घटली आहे’, असा अहवाल ‘लाईफ वे रिसर्च’ने काढला आहे. त्यामुळे अमेरिकेतील ४ सहस्र ५०० चर्च बंद करण्यात आली आहेत. भारतात मात्र ख्रिस्ती धर्मोपदेशक हिंदु धर्माला नावे ठेवत ख्रिस्ती धर्माचा जोरात प्रसार करत धर्मांतरे करत आहेत, चर्च स्थापन करत आहेत. पाद्य्रांच्या खोटेपणाला उघड करण्यासाठी आता जागृत हिंदूंनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे.
ख्रिस्त्यांमधील जीवघेण्या अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष करणारी माध्यमे आणि संघटना समाजद्रोहीच असून त्यांना खडसावणे आवश्यक ! |