‘हिंदु मित्रांशी का बोलतेस ?’, असे म्हणत धर्मांधांची मुसलमान तरुणीला मारहाण !
हिजाब खेचत भ्रमणभाष संच हिसकावला !
छत्रपती संभाजीनगर – हिंदु मुलांशी बोलत असल्याचे आढळल्याने काही धर्मांधांनी एका १८ वर्षीय मुसलमान तरुणीला भररस्त्यात मारहाण केली. त्याचसमवेत तिचा हिजाब ओढून ३-४ धर्मांधांनी बॅग ओढत शिवीगाळ केली. भ्रमणभाषमध्ये त्याचे चित्रण करून व्हिडिओ प्रसारित केला. ३ दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ समाजात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून तक्रारदार होत गुन्हा नोंद करून ३ धर्मांधांना अटक केली आहे. उस्मानपुर्याचा शेख गयाज उपाख्य बब्बू शेख रियाज, नदिम खान फिरोज खान आणि सुफियान खान मुसा खान अशी अटक केलेल्या धर्मांधांची नावे आहेत.
१. मूळ शिर्डीची असलेली ही मुसलमान तरुणी तिच्या २ हिंदु मित्रांसह टाऊन हॉल परिसरातून आसेफिया कॉलनीकडे जात होती.
२. तेव्हा काही धर्मांधांनी त्यांच्याकडे धाव घेत त्या २ हिंदु मुलांवर आक्रमण केले. त्यानंतर मुलीला पकडून, ‘तू हिंदु मुलांसमवेत का बोलते ? का फिरतेस ?, असे म्हणत त्यांनी तिला मारहाण केली.
३. या वेळी त्यांनी तिचा हिजाब ओढला. ३-४ धर्मांधांनी तिचा व्हिडिओ चित्रित करून ‘हिच्या कुटुंबियांना सांगा, हिचा व्हिडिओ काढा’, असे म्हणत धमकावले. तेव्हा तरुणीने आरडाओरड केली.
४. दोघांनी तिच्या हातातून भ्रमणभाषसंच हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि हातगाडी चालक तरुणीला साहाय्य न करता पहात होते.
५. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी तात्काळ तिच्या कुटुंबियांना बोलावून घेतले.
६. मुलीच्या आईने तक्रार करण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी तक्रारदार होत गुन्हा नोंद केला.
७. उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी आरोपींचा शोध चालू केला आहे.
संपादकीय भूमिका
|