नियमित व्यायाम केल्याने होणारे लाभ

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८९

प्रतिकात्मक छायाचित्र

१. ‘नियमित व्यायाम केल्याने शरिराचे बळ, तसेच कार्य करण्याची क्षमता वाढते.

२. व्यायामामुळे पचनशक्ती उत्तम रहाते. नियमित व्यायाम करणार्‍याला आहारातील लहानसहान पालट बाधत नाहीत.

३. व्यायाम केल्याने शरिरातील अनावश्यक मेद (चरबी) न्यून होऊन शरीर पिळदार होते.

४. व्यायामामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे वातावरणात पालट झाल्याने होणार्‍या सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.

५. व्यायामामुळे मनाची कार्यक्षमता वाढते, तसेच कठीण प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता निर्माण होते.

असा हा अनेक अमूल्य लाभ करून देणारा व्यायाम प्रत्येकाने नियमित करायलाच हवा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२३)

­लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan