पावसाळ्यापूर्वीच परशुराम घाटातील महामार्गाचे काम पूर्ण करून दुतर्फा वाहतूक चालू होण्याची शक्यता !
चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवसातील ५ घंटे वाहसुकीस बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून तो बुजवण्याचे काम चालू करण्यात आले आहे. पुढील ८ दिवसांत घाटातील धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम पूर्ण करून तातडीने कॉक्रिटीकरणाच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आधीच घाटातील काम पूर्ण करून दुतर्फा वाहतूक (दोन्ही लेन) चालू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घाटातील धोकादायक स्थितीतील ५०० मीटर अंतरातील डोंगर कटाई आणि संरक्षण भिंतीस भराव भरण्याच्या कामासाठी २५ एप्रिल ते १० मे या कालावधीत घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे.