छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अकोल्यातील बार्शी टाकळीच्या धर्मांध नगरसेवकांचा विरोध !
विरोध करणार्या काँग्रेस नगरसेवकांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का ? – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रश्न
अकोला – येथील बार्शी टाकळी नगरपंचायतीच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव संमत करण्यात आला; परंतु नगरपंचायतीमधील धर्मांध नगरसेवकांनी तीव्र विरोध करत ठराव नामंजूर करण्याची मागणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी, नगरपंचायत यांच्याकडे केली आहे. यावरून ‘राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणार्या काँग्रेस नगरसेवकांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का ?’, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी ट्वीट केले असून त्यासमवेत संबंधित नगरसेवकांनी स्वत:चे नाव आणि स्वाक्षरीनिशी बार्शी टाकळीच्या नगराध्यक्षांना पाठवलेले पत्रही जोडले आहे.
पुतळ्याला विरोध करणार्या नगरसेवकांचा भाजपच्या वतीने आज निषेध करण्यात आला आहे. या वेळी बार्शी टाकळी येथील तहसीलदारांच्या वतीने शासनाला निवेदन पाठवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|