काँग्रेस पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हटवण्याच्या गोष्टी करत आहे ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
मंड्या (कर्नाटक) – आमच्या सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (‘पी.एफ्.आय.’वर) बंदी घातली; परंतु काँग्रेस ती बंदी उठवण्याच्या गोष्टी करत आहे. काँग्रेस पी.एफ्.आय.चे तुष्टीकरण करत आहे, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे एका प्रचारसभेत केले.
#WATCH एक ओर डबल इंजन की सरकार PFI को बैन करती है और दूसरी ओर कांग्रेस तुष्टिकरण का काम करती है, उन्हें धर्म के आधार पर आरक्षण देने का काम करती है। धर्म के आधार पर आरक्षण भारत के संविधान के विपरीत है, असंवैधानिक है: उत्तर प्रदेश CM योगी आदित्यनाथ, मांड्या, कर्नाटक pic.twitter.com/QIlNfE3jc4
— ANI_HindiNews (@AHindinews) April 26, 2023
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की,
१. आता जगात कुठेही गेलात, तरी भारतियांचा आदर केला जातो. आता भारत जगातील ५ वी मोठी अशी अर्थव्यवस्था आहे. जी-२० राष्ट्रांचे नेतृत्व आता भारताच्या हातात आहे. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेशी समरस व्हा. आपल्याकडे शक्ती आणि युक्तीदेखील आहे.
२. पूर्वी पंचवार्षिक योजना होती. ती पूर्ण होण्याआधीच दुसर्या पंचवार्षिक योजनेस प्रारंभ होत असे. कोणतेही कार्य पूर्ण होत नसे. ही काँग्रेसच्या व्यवस्थापनाची शैली होती; परंतु आता पंतप्रधान मोदी हे एखाद्या प्रकल्पाची पायाभरणी करतात आणि नंतर तेच त्याच्या उद्घाटनाला येतात.