केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार !

‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !

काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला (डावीकडे) पोलिसांत तक्रार देताना

बेंगळुरू (कर्नाटक) – काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. शहा यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत बोलतांना ‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील, असे विधान केले होते.’ तसेच काँग्रेसने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हटवण्याचे आश्‍वासन दिले आहे’, असा दावाही शहा यांनी केला होता.

याविषयी सुरजेवाला म्हणाले की, अमित शहा यांची ही दोन्ही विधाने द्वेष पसरवणारी आणि काँग्रेसला अपकीर्त करणारी आहेत. त्यामुळे आम्ही अमित शहा आणि भाजप यांच्या विरोधात बेंगळुरू येथील हाय कमांड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात दंगली होतात, हे काही नवीन नाही. आजही जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे केली जातात, हे राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतून नुकतेच दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी स्वतःकडे पहावे, असेच हिंदूंना वाटते !